रक्षाबंधन निमित्त सोसायटीच्या कापड विभागात 15% डिस्काउंट 2 सप्टेंबर 2023 पर्यंत. | तेल कर्ज योजना दिनांक 6 फेब्रुवारी 2024 पर्यंत कार्यान्वित राहील. तसेच तांदूळ 90 दिवसाच्या क्रेडिट वर दिनांक 29 फेब्रुवारी 2024 पर्यंत मिळतील. इच्छुकांनी सोसायटीचा त्वरित संपर्क साधावा.
Thumb Thumb

१९४२ मध्ये करण्यात

आमच्याबद्दल

" एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ " या उदात हेतूने सोसायटीची स्थापना सन १९४२ मध्ये करण्यात आली. आज सोसायटीच्या भद्र विस्तारात दोन मोठया इमारती आहेत. सहकार भवन आणि सहकार सेतू मोठ्या डौलात उभ्या आहेत. सहकार सेतू मध्ये सोसायटीचे कार्यालय ,क्रेडिट विभाग, प्रोव्हिजन स्टोअर , कापड विभाग आहे. तर सहकार भवन इमारतीत गेस्ट हाऊस आहे. सोसायटीचे टोरेंट पॉवर बिल्स कलेक्शन सेंटर मिलन कॉम्प्लेक्स मणिनगर येथे आहे. सोसायटीचे विभाग खालील प्रमाणे आहेत.

क्रेडिट विभाग

क्रेडिट विभागात ठेवी आणि कर्ज इत्यादींचे विविध प्रकार राबविण्यात येतात. ठेवी मध्ये मुख्यत्वे अनिवार्य मासिक बचत योजना प्रामुख्याने कार्यरत आहे. जोडीला सेविंग्स ठेव आणि ठराविक मुदत ठेवी योजना पण अमलात आहे.कर्ज योजना मध्ये प्रामुख्याने दोन लायक सभासदांच्या तारणावर कर्ज, मासिक बचत जमा रकमेवर कर्ज, शेक्षणिक कर्ज, वाहन कर्ज, तेल कर्ज इत्यादी आहे.

प्रॉव्हिजन स्टोअर

प्रोव्हिजन स्टोअर मध्ये दैनदिन घरात लागणाऱ्या किराणा अन्न धान्ये, साबू इत्यादी वस्तू विकल्या जातात. ९० दिवसाच्या क्रेडिटवर गहू, तांदूळ पुरविले जातात. सवलतीच्या दरात तूरडाळ विकली जाते.सभासदांना ६० दिवसाच्या क्रेडिटवर कापड आणि किराणा माल देण्यात येतो.

कापड विभाग

कापड विभागात बेळगाव , इचलकरंजी ,मालेगाव येथून साडया ड्रेस मटेरियल्स शूटिंग शर्टींग , मोजे , सोलापुरी चादर बेडशीटस इत्यादी खरेदी करून त्यांची विक्री केली जाते.

गेस्ट हाऊस

सहकार भवन, इमारतीतील गेस्ट हाऊस मध्ये २५ कॉटची व्यवस्था आहे. एकंदरीत ५ ब्लॉक्स मध्ये प्रत्येक ब्लॉक मध्ये स्वतंत्र टॉयलेट बाथरूमची सोय आहे. बाहेर गावाहून येणाऱ्या पाहुण्यांची अल्प दरात राहण्याची सोय केली जाते.

टोरेंट पॉवर बिल्स कलेक्शन सेंटर

मिलन कॉम्प्लेक्स मणिनगर येथील बिल्स कलेक्शन सेंटर मध्ये टोरेंट पॉवर बिल्स स्वीकारली जातात.